chessbase india logo

कै. तम्माण्णाचार्य पडसलगीकर स्मृती ८ वर्षाखालील खुल्या बुध्दिबळ स्पर्धा २०२५

by Vivek Sohani - 04/05/2025

कै. भाऊसाहेब यांनी स्थापन केलेल्या नूतन बुध्दिबळ मंडळातर्फे गेली ५६ वर्षे भरत असलेल्या स्पर्धा या वर्षीही सांगली आणि बुध्दिबळ हे जुने समीकरण घेऊन येत आहेत. मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष मा.सोहन शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ८, १०, १२, १४, १६ या वयोगटातील स्पर्धा तसेच रॅपिड व टिम चॅम्पियनशिप, महिलांसाठी कै. सौ. मीनाताई शिरगांवकर खुली रॅपिड व खुल्या गटासाठी आदरणीय कै. बाबूकाका शिरगांवकर स्मृती फिडे रेटिंग स्पर्धा अशा ११ विविध स्पर्धा त्याचप्रमाणे बुध्दिबळ प्रशिक्षण असा हा महोत्सव सांगली शिक्षण संस्थेच्या डॉ. बापट बाल शिक्षणमंदिरात दि. २७ एप्रिल ते ८ जून अखेर चालणार आहे.

नूतन बुध्दिबळ मंडळ, सांगली आयोजित ५६ व्या कै. भाऊसाहेब पडसलगीकर स्मृती सांगली बुध्दिबळ महोत्सवातील कै. तम्माण्णाचार्य पडसलगीकर स्मृती ८ वर्षाखालील खुल्या बुध्दिबळ स्पर्धेला बापट बाल शिक्षणमंदिरात सुरूवात झाली. सांगली, मिरज,जत, कोल्हापूर, इचलकरंजी आदि शहरातील २४ बुध्दिबळपटू सहभागी झाले होते. यामध्ये अथर्वराज ढोले, स्मित लिमये, शिवांश सुतार,अर्णव वरूटे, रिदम दोशी, अथर्व पोतदार, ईशान माईनकर, सुयोग काकाणी, वेदांन्त शिंदे,केशव कौशिक, श्रेयस पांडव, अनुप कानडे या नामांकितासह अभिनंदन शिंदे, अन्वी बजाज या नवोदिताचा समावेश आहे.

बाल बुद्धिबळ खेळाडूंची चमकदार कामगिरी:

सहाव्या फेरीत सांगलीचा रिदम दोशी व कोल्हापूरचा अथर्वराज ढोले यांच्यातील डावात रिदमने रचलेल्या चालीना अथर्वराजने प्रत्युत्तर देऊन रिदमचा ३५ व्या चालीला पराभव करून ६ गुणासह रू. ३०००/- च्या रोख पारितोषिकासह अथर्वराजने कै. तम्माण्णाचार्य पडसलगीकर चषक पटकाविला. तर रिदमने ४ गुणासह रिदमला पाचव्या स्थानावर जावे लागले. दापोलीचा स्मित लिमये व इचलकरंजीचा अर्णव वरूटे यांच्यातील डावात स्मितने रचलेल्या चालीना अर्णव प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरला अखेर स्मितने ५ गुणासह रू. १५००/- च्या रोख पारितोषिकासह उपविजेतेपद पटकाविले. तर अर्णवला ४ गुणासह रू. ५००/- च्या रोख पारितोषिकासह चौथ्या स्थानावर जावे लागले.

कै. तम्माण्णाचार्य पडसलगीकर स्मृती ८ वर्षाखालील खुल्या बुध्दिबळ स्पर्धेचा विजेता कोल्हापूरचा अथर्वराज ढोले व दापोलीचा उपविजेता स्मित लिमये याला पारितोषिक देताना मा. राजेंद्र साळोखे, चिंतामणी लिमये, मोहिनीराज डांगे

शिवांश सुतार व अनिरूध्द साळुंखे यांच्यातील डावात शिवांशने रचलेल्या चालीना अनिरूध्दने प्रत्युत्तर देऊन डावात आघाडी घेतली. व अखेर शिवांशने अनिरूध्दचा ३८ व्या चालीला पराभव करून ४ गुणासह रू. १०००/- च्या रोख पारितोषिकासह तिसरे स्थान पटकाविले. अथर्व पोतदार व अनुप कानडे यांच्यातील डावात अथर्वने रचलेल्या चालीना अनुप प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरला अखेर ३२ व्या चालीला अथर्वने अनुपचा पराभव करून ४ गुणासह सहावे स्थान पटकाविले. सांगलीचा ईशान माईणकर व श्रेयस पांडव यांच्यातील डावात ईशानने रचलेल्या चालीना प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या श्रेयसचा २८ व्या चालीला पराभव करून ईशानने ४ गुणासह सातवे स्थान पटकाविले. तर श्रेयसला ३ गुणासह अकराव्या स्थानावर जावे लागले. इचलकरंजीचा सुयोग काकाणी व वेदान्त शिंदे यांच्यातील डावात सुयोगने रचलेल्या चालीला वेदात प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या वेदान्तला ३२ व्या चालीला पराभूतकेले सुयोगने ४ गुणासह आठवे तर वेदांतला ३.५ गुणासह नवव्या स्थानावर जावे लागले.

स्पर्धेचा विस्तृत निकाल खालील प्रमाणे:

१) अथर्वराज ढोले (कोल्हापूर- ६,

२) स्मित लिमये ( दापोली )-५,

३) शिवांश सुतार – ४ ,

४) अर्णव वरूटे -४,

५) रिदम दोशी-४,

६) अथर्व पोतदार -४,

७) ईशान माईनकर -४

८) सुयोग काकाणी -४,

९) वेदांन्त शिंदे – ३.५ ,

१०) केशव कौशिक – ३.५,

११) श्रेयस पांडव - ३,

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ बुद्धिबळ खेळाडू मा. राजेंद्र साळोखे यांच्याहस्ते चिंतामणी लिमये, मोहिनीराज डांगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेचे पंच म्हणून आरती मोदी, नाझिया पटेल, मोहिनीराज डांगे,दिपक वायचळ यांना काम पाहिले.


Contact Us