chessbase india logo

कै. सौ. मीनाताई शिरगांवकर स्मृती स्पर्धेत गोव्याची अस्मिता रे विजेती तर कोल्हापूरची शर्वरी कबनूरकर उपविजेती

by Vivek Sohani - 12/05/2025

नूतन बुध्दिबळ मंडळ, सांगली आयोजित ५६ व्या कै. भाऊसाहेब पडसलगीकर स्मृती सांगली बुध्दिबळ महोत्सवातील कै. सौ. मीनाताई शिरगांवकर स्मृती खुल्या महिला बुध्दिबळ स्पर्धेत गोव्याच्या अस्मिता रे ने नावलौकिकाला साजेसा खेळ करत स्पर्धेत अपराजित राहून विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचे दिपप्रज्वलन , श्रीफळ वाढवून व पटावरील चाल खेळून एमएसईबी होल्डींग कंपनीच्या संचालिका सौ. नीता केळकर व भाजपा माजी नगरसेविका मा. उर्मिला बेलवलकर लिमये यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मा.सौ.नीताताई केळकर यांचा स्मिता केळकर तर सौ. उर्मिला बेलवलकर यांचा सीमा कठमाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या स्पर्धेला महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, पणजी, बेळगांव आदि शहरातील १५१ महिला बुध्दिबळपटू सहभागी झाल्या होत्या.

कै. सौ. मीनाताई शिरगांवकर स्मृती महिला बुध्दिबळ स्पर्धेची विजेती गोव्याची अस्मिता रॅाय हिला विजेती पदकाची ढाल व पारितोषिक देताना हिमगौरी व सिध्दार्थ गाडगीळ, सचिन शिरगांवकर, चिदंबर कोटीभास्कर,

देशातील महिलांसाठी रु. १,००,०००/- पारितोषिकाची आणि प्रवेश शुल्क नसलेली अशी एकमेव स्पर्धा :

स्पर्धेच्या आठव्या फेरीत गोव्याची अस्मिता रॅाय व जतची सृष्टी हिप्परगी यांच्यातील डावात अस्मिताने रचलेल्या चालीना प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या सृष्टीचा ३५ व्या चालीला पराभव करून अस्मिताने रू.१५००१/- च्या रोख पारितोषिकासह मीनाताई शिरगांवकर फिरता चषक पटकाविला तर सृष्टीला ६ गुणासह रू. ४०००/- च्या रोख पारितोषिकासह सहाव्या स्थानावर जावे लागले. कोल्हापूरची तृप्ती प्रभू व कोल्हापूरची शर्वरी कबनूरकर यांच्यातील डावात तृप्तीने रचलेल्या चालीना शर्वरीने प्रत्युत्तर देऊन३२ व्या चालीला तृप्तीचा पराभव केला ७ गुणासह शर्वरीने रू. १२५००/- च्या रोख पारितोषिकासह उपविजेतेपद पटकाविले तर तृप्तीला ६ गुणासह रू.१५००/- च्या रोख पारितोषिकासह नववे स्थान पटकाविले. कोल्हापूरची अरीना मोदी व कोल्हापूरची दिव्या पाटील यांच्यातील डावात अरीनाने रचलेल्या चालीना दिव्याने प्रत्युत्तर देऊन अरीनाचा ३० व्या चालीला पराभव केला दिव्याने ७ गुणासह रू.८०००/- च्या रोख पारितोषिकासह तिसरे स्थान पटकाविले तर अरीनाला ६ गुणासह रू. १०००/- च्या रोख पारितोषिकासह अकराव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

अस्मिता रे ची सनसनाटी कामगिरी

पुण्याची सई पाटील व सांगलीची ईश्वरी जगदाळे यांच्यातील डावात सईने रचलेल्या चालीना प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या ईश्वरीचा ३१ व्या चालीला पराभव करून सईने ६.५ गुणासह रू. ६०००/- च्या रोख पारितोषिकासह चौथे स्थान पटकाविले तर ईश्वरीला ५.५ गुणासह २० व्या स्थानावर जावे लागले. जिया शेख व कोल्हापूरची अनुष्का पाटील यांच्यातील डावात जियाने रचलेल्या चालीना अनुष्काने प्रत्युत्तर देऊन ३५ व्या चालीला अनुष्काने जियाचा पराभव करून ६.५ गुणासह रू. ५०००/- च्या रोख पारितोषिकासह पाचवे स्थान पटकाविले तर जियाला ५ गुणासह २८ व्या स्थानावर जावे लागले. जतची श्रीया हिप्परगी व सातारची साजिरी देशमुख यांच्यातील डावात श्रीयाने रचलेल्या चालीना साजिरीने जशास तसे प्रत्युत्तर देऊन डावावर समान वर्चस्व राखले. अखेर ३३ व्या चालीला दोघीनी डाव बरोबरीत सोडवून अर्ध्या गुणासह श्रीयाने ६ गुण मिळवून रू. ३०००/- च्या रोख पारितोषिकासह सातवे स्थान पटकाविले तर साजिरीला ६ गुणासह रू. १०००/- च्या रोख पारितोषिकासह चौदाव्या स्थानावर जावे लागले. कोल्हापूरची संस्कृती सुतार व सांगलीची सिध्दी वरूडे यांच्यातील डावात संस्कृतीने रचलेल्या चालीना प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या सिध्दीचा ३२ व्या चालीला पराभव करून संस्कृतीने ६ गुणासह रू.१२००/- च्या रोख पारितोषिकासह दहावे स्थान पटकाविले.

या स्पर्धेचे दिपप्रज्वलन , श्रीफळ वाढवून व पटावरील चाल खेळून एमएसईबी होल्डींग कंपनीच्या संचालिका सौ. नीता केळकर व भाजपा माजी नगरसेविका मा. उर्मिला बेलवलकर लिमये यांच्याहस्ते करण्यात आले.

स्वपर्धेचा विस्तृत निकाल व विजेते खालीलप्रमाणे–

मुख्य बक्षिसे :

१) अस्मिता रे (गोवा)-८

२) शर्वरी कबनूरकर ( कोल्हापूर )-७ 

३) दिव्या पाटील ( कोल्हापूर )-७

४) सई पाटील ( पुणे )-६.५

 ५) अनुष्का पाटील ( कोल्हापूर )-६.५

६) सृष्टी हिप्परगी ( जत )-६ 

७) श्रीया हिप्परगी ( जत )-६

८) श्रीया पाटील ( कोल्हापूर )-६ 

९) तृप्ती प्रभू ( कोल्हापूर )-६

१०) संस्कृती सुतार ( कोल्हापूर )-६ 

११) अरीना मोदी ( कोल्हापूर )-६

१२) दिशा पाटील ( कोल्हापूर )-६ 

१३) तन्मयी घाटे -६

१४) साजिरी देशमुख ( सातारा )-६ 

१५) पूनम चांडक ( इचलकरंजी )-६

१६) अनुजा कोळी ( सांगली )-६ 

१७) नंदिनी सारडा ( सांगली )-६

१८) सारा हरोले ( सांगली)-६ 

१९) वैष्णवी परब ( गोवा )-६

२०) ईश्वरी जगदाळे ( सांगली)-५.५ 

२१) मानसी तिळेकर -५.५

२२) अंकिता नरळे ( सांगली )-५.५ 

२३) मृण्मयी गोसावी ( सांगली)-५.५

२४) सिध्दी बुबणे ( इचलकरंजी )-५.५ 

२५) माधवी देशपांडे ( सांगली)-५.५

२६) आदिती कापसे - ५ 

२७) अनुष्का गांधी -५

२८) जिया शेख – ५ 

२९) श्रुती कुलकर्णी ( इचलकरंजी)-५

३०) स्नेहा उप्पीनपाटील -५

उत्तेजनार्थ बक्षिसे :

  • उत्कृष्ठ ज्येष्ठ खेळाडू

    • फ्लोरीना परूळेकर, कविता शहा

  • उत्कृष्ठ ७ वर्षाखालील

    • अवनी उपाध्ये, अन्वी पांडव, चार्मी शहा, अन्वी बजाज, व्दिजा सकळे, साक्षी निर्मळे, संस्कृती कुबाडगे, ओमिता माणगांवकर, इरा तारळेकर

  • उत्कृष्ठ ९ वर्षाखालील

    • शनाय मालाणी, अनामिका गोंधळे, अन्वेशा सोनी, ओमी परब, सिध्दी राजमाने, भक्ती कोळी, मनस्वी शिरगुरे, कृष्णा पाटील, अवनी सूर्यवंशी, स्वाध्या धोंगडे

  • उत्कृष्ठ ११ वर्षाखालील

    • थिया शहा, आयुषी घोरपडे, श्रुती पाडंव, गार्गी गुरव, माही तारळेकर, अवनी कोठार, सांची चौधरी, पूर्वा पवार, प्रज्ञा परूळेकर, अविरा फडके

  • उत्कृष्ठ १३ वर्षाखालील

    • श्रीनिधी भोसले, आरोही बनसोडे, सिध्दी कर्वे, सृष्टी जोशीराव, धनश्री पोर्लेकर, मृणार पाडंव, जान्हवी जाधव, परूषा गिताजे, स्वरा पवार, आरह जोशी

  • उत्कृष्ठ १५ वर्षाखालील

    • प्रियदर्शनी ठोमके, सृष्टी चिंचणे, शर्वरी आंबी, सिध्दी वरूडे, आंचल सोनी, स्नेहल गावडे, नियती चोडणकर, अवनी कुलकर्णी, प्रिशा कोठारी, कनक मर्दा

  • उत्कृष्ठ सांगली खेळाडू

    • पल्लवी जाधव, सारा मुल्ला, वर्षा पेंडे, सृष्टी पवार, अन्वी कुणले, तेजस्वीनी बिरादार, अस्मिता कोळी, अरूणा पुराणिक, संचिता कोळी, प्राजक्ता पाटील, मधुरा कांबळे, वेदिका पवार, ऐश्वर्या सुतार, आराध्या पवार, संगिता पवार, आभिदन्या पेंडे, समिक्षा जाधव

  • दिव्यांग खेळाडू

    • प्रेरणा उगारे, प्रिया खोत

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पु. ना. गाडगीळ सराफचे संचालक मा. सिध्दार्थ गाडगीळ, सौ.हिमगौरी गाडगीळ, एस बी रिसेलर्सचे संचालक मा. सचिन शिरगांवकर, यांच्याहस्ते चिदंबर कोटीभास्कर व चिंतामणी लिमये यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. चिंतामणी लिमयेया स्पर्धेचे पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावी- माने, आरती मोदी, शैलेश व्होनकट्टी , विजय सलगर, मोहिनीराज डांगे, दिपक वायचळ यांनी काम पाहिले.


Contact Us