chessbase india logo

फिडे महिला ग्रँड प्रिक्स पुणे - हम्पी विजेती; दिव्या तिसऱ्या स्थानी विराजमान

by Vivek Sohani - 25/04/2025

GM कोनेरु हम्पीने अंतिम फेरीत IM नुर्ग्यूल सलिमोवा (BUL)ला पराभूत करून फिडे महिला ग्रँड प्रिक्स जिंकली. तिच्या प्रतिस्पर्धी GM झू जायनर (CHN) ने IM पोलिना शुवालोव्हा विरुद्ध आपला सामना जिंकला. हम्पी आणि जायनर ह्या दोघींनी ७/९ गुण मिळवले, पण हम्पीने चांगल्या टाय-ब्रेक स्कोअरमुळे स्पर्धा जिंकली, आणि जिनरने दुसरे स्थान पटकावले. IM दिव्या देशमुखने IM अलीना काशलिंस्काया (POL)सोबत बरोबरी केली आणि ५.५/ ९ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. हम्पीने ग्रँड प्रिक्स ११७.५ गुणांची वाढ केली आणि ती २७९.१७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचली. जायनर तिच्या मागे 235 गुणांसह आहे. हम्पीला आशा आहे की, जायनर पुढच्या महत्त्वाच्या GP इव्हेंटमध्ये तिला मागे टाकणार नाही, ज्यामुळे हम्पीला ग्रँड प्रिक्स स्पर्धांमधून पुढील महिला कँडिडेट्समध्ये स्थान मिळू शकेल. एकूण बक्षीस निधी €८०००० होता. टॉप तीन बक्षिसे अशी होती: €१८०००, €१३००० आणि €१०५००, तसेच प्रत्येकाला एक ट्रॉफी आणि मेडल देण्यात आले. पुढील चरण ग्रॉस्लोबमिंग, ऑस्ट्रिया येथे ५ मे ते १६ मे २०२५ दरम्यान होईल.

हम्पी आणि जायनर यांनी त्यांच्या शेवटच्या फेरीतील सामने जिंकले

फिडे महिला ग्रँड प्रिक्स पुणेची विजेती कोनेरू हम्पी | फोटो : शाहीद अहमद
GM कोनेरू हम्पी आणि GM झु जायनर यांच्या सामन्यावर IM सागर शाह यांनी केलेली कमेंट्री | व्हिडिओ: ChessBase India

उपविजेती - GM झु जायनर | छायाचित्र: शाहिद अहमद

तृतीय स्थानी विराजमान - नागपूरची दिव्या देशमुख | फोटो : शाहीद अहमद

पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळेस विजेत्या खेळाडूंसह मान्यवर | फोटो : शाहीद अहमद

हम्पी - नुर्ग्युल : १-०

GM कोनेरू हम्पी हिने ने नुर्ग्युल सालीमोव्हा विरुद्ध खेळलेल्या तीन क्लासिकल दर्जाच्या डावांमध्ये पहिला सामना गमावला आणि नंतरचे दोन जिंकले. या वेळी तिला एक आभासी 'मस्ट-विन' स्थितीत सामना करावा लागला. सलिमोव्हा ने खेळाच्या सुरुवातीला मोठ्या चुका केल्या, जेव्हा तिचा राजा बोर्डच्या मध्यभागी अडकला.

१८. .... Bd6 नंतरची स्थिती

19.e4 Qe7 20.exd5 exd5 21.Qd3 Qf6 22.Re1+ नंतर तिने एक प्यादे मिळवले आणि आपल्या चांगल्या स्थितीचा पुरेपूर उपयोग करून विजय प्राप्त केला.

जीएम कोनेरू हम्पी आणि जीएम झू जायनर (CHN) यांच्याशी मुलाखत | व्हिडिओ: फिडे

GM कोनेरू हम्पी हिने IM नुर्ग्यूल सलिमोवा (BUL) हिच्याविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेत बाजी मारली. | फोटो: अनमोल भार्गव

दिव्या - अलिना ०.५ - ०.५

वैशाली आर - मेलिया सलोम - ०.५ - ०.५

GM हरिका द्रोणवली आणि IM बटख्याग मंगंतुुल (MGL) - 0.5-0.5 | फोटो: अनमोल भार्गव

पोलिना शुवालोवा - झु जायनर ०-१ | फोटो: अनमोल भार्गव

ग्रँड प्रिक्स गुणतालिका

GM अलेक्सांद्रा गोर्याचकिना अजूनही 308.34 गुणांसह आघाडीवर आहे. तिच्या पुढील कँडिडेट्स स्पर्धेतील स्थानाची हमी आहे, कारण फक्त GM झू जायनर (CHN)च तिच्या स्थानावर पोहोचू शकते, आणि ती २३५ गुणांवर आहे. GM कोनेरु हम्पी दुसऱ्या स्थानावर 279.17 गुणांसह पोहोचली आहे. हम्पीला आशा आहे की, जायनर पुढच्या महिन्यात ऑस्ट्रियामध्ये होणाऱ्या GP मध्ये तिला मागे टाकणार नाही, जेणेकरून हम्पीला पुढील कँडिडेट्समध्ये स्थान मिळवता येईल.

कोनेरू हम्पी पुण्यातील विजयामुळे दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
आयएम राकेश कुलकर्णी आणि सीएम साहिल टिकू यांच्याकडून लाइव्ह कमेंट्री | व्हिडिओ: फिडे

बक्षिसे :

एकूण बक्षीस निधी €८०,००० इतका आहे. त्यापैकी पहिले तीन क्रमांकाचे बक्षिसे अनुक्रमे €१८०००, €१३०००आणि €१०५०० आहेत. तसेच टॉप तीन ग्रँड प्रिक्स पॉइंट्स पुढीलप्रमाणे आहेत: पहिला क्रमांक: १३० गुण, दुसरा क्रमांक: १०५ गुण, तिसरा क्रमांक: ८५ गुण

स्पर्धेचे वेळापत्रक :

ही स्पर्धा १४ एप्रिल २०२५ पासून २३ एप्रिल २०२५ पर्यंत होणार आहे.


Contact Us